बाळापूर अंजुमन शिक्षण संस्थेत शिक्षणाचा खेळ खंडोबा

A thoughtful child gazes through a wire fence, symbolizing innocence and curiosity.

. सन १९७० ते १९८० च्या दशकात बाळापूर शहर आणि परिसरातील उर्दू भाषिकां साठी माध्यमिक स्तरा पर्यंत शिक्षणा करिता अंजुमन उर्दू हायस्कूल विद्यार्थ्यांची पहिली पसंत होती. बाळापूर शहरातील मुस्लिम समाजातील तत्कालीन सर्व सामान्य ,बुद्धीजीवी, मध्यमवर्गीय व गोर गरीब लोकांनी आपले रक्ताचे घाम करून,कष्टाच्या कमाईने हि संस्था उभी केली होती आणि दर्जेदार शिक्षणाचे उद्दिष्टा सह भावी पिढी चे उज्ज्वल भविष्य समोर ठेवून लोकशाही पद्धतीने ह्या संस्थे द्वारे शाळेचे कामकाज चालत होते.
सदर कालावधीत शासनाच्या वतीने भरपूर निधी,सोई सुविधा आणि भौतिक सुविधेसाठी अनुदान उपलब्ध होत नव्हते.

. अंदाजे सन १९५४/५५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या ह्या संस्थेत लोकशाही पद्धतीने मोहल्लया , मोहल्लयातुन मुस्लिम समाज चार आण्या ची सभासद पावती घेऊन आपल्या मोहल्लयातुन एक प्रतिनिधी ठराविक कालावधी साठी पाठवायचा.
सदरील प्रतिनिधी ठराविक वर्षा पर्यंत संस्थे च्या कार्यभारात सहभागी होऊन आपली भूमिका पार पाडत होता.
कालावधी पूर्ण झाल्यावर पुन्हा लोकशाही पद्धतीने तिच प्रकिया राबवून समाजातील अन्य योग्य व्यक्ती संस्थेत निवडून जात होते.शहरातील काही सक्रिय , मोलाचे योगदान करणारे आणि दानशूर व्यक्ती संस्थेचे आजिवन सभासद होते.
बाळापूरातील मुस्लिम समाज सहिष्णुता,आदर आणि परंपरे शी फार जवळीक ठेवतो त्या अनुषंगाने संस्था चालकांनी श्री नातिक खतीब यांचे वडील मर्हूम हुस्सामोददीन खतीब ला सुद्धा प्रतिष्ठित नागरिक म्हणून संस्थेत ठेवण्याचा मान सन्मान व ठराविक कालावधी साठी अध्यक्षपद दिला असावा परंतु संस्थेची , बांधनी, निर्माण , प्रगती मध्ये त्यांची किंवा श्री हमीद वकील यांचे वडीलांची कोणतीही सक्रिय भुमिका, योगदान, आर्थिक सहाय्य दूर दूर पर्यंत अजिबात दिसत नाही.

. उलट जवळपास चार दशकां पुर्वी श्री नातिक खतीब आणि श्री हमीदोदीन ह्या दोन्ही व्यक्तींनी तात्पुरती सदस्यता प्रणाली चा लाभ घेवून अंजुमन संस्थेत प्रवेश मिळविला आणि न पा क्षेत्रांतील सत्ता, राजकीय वर्चस्व,स्वतः ची राजकीय पकड चा गैरफायदा घेऊन फार चतुराईने ( कायम स्वरुपी) संस्थे ची आजीवन सदस्यता प्राप्त केली. संस्थेत प्रवेश, पकड व वर्चस्व मिळविल्या नंतर
हळूहळू कायद्याच्या चौकटीत राहून संस्थेची नियमावली ( बायलाॅज ) मध्ये बदल घडवून आणले व सर्व सामान्य मुस्लिम समाजातुन संस्थे वर निवडुन येणाऱ्या सर्व सामान्य प्रतिनिधींना संस्थेत प्रवेश करण्याचा मार्ग कायमचा बंद केला. संस्थेत सदस्य संख्या मर्यादित करून टाकली, स्वतः चा दिर्घ कालीन ताबा टिकून रहावा व आपल्या नंतर आपल्या मुलाच्या ताब्यात सुद्धा संस्था राहावी या करिता आपल्या प्रभावातील काही ठराविक व्यक्तींना संस्थे चे आजिवन सदस्य पद बहाल करण्यात आले. आणि अश्या प्रकारे अंजुमन संस्थेत असलेल्या लोकशाही पद्धतीचा फज्जा उडाला. अंजुमन अन्वारूल इस्लाम ट्रस्ट आपल्या पुर्व जनानी उभा केलेला आहे , शाळा आपल्या आहेत हि संकल्पना मुस्लिम समाजाच्या नवीन पीढी च्या डोक्यातुन नष्ट करण्यात आली. अखेर घराणेशाही टिकवण्याची कसरत करणाऱ्या प्रवृत्ती ला यश प्राप्त झाले.
श्री हमीद वकील जिवाच्या शेवटच्या कालावधी पर्यंत अंजुमन चे अध्यक्ष राहिले.त्यांच्या नंतर श्री खतीब यांनी स्वतः च्या मुलाला कागदोपत्री नियमांचा पाठपुरावा करून अंजुमन शैक्षणिक संस्थे मध्ये अध्यक्ष करून टाकले.
वास्तविक खतिबाच्या अंजुमन संस्थेत प्रवेशा पुर्वी अंजुमन शाळेची प्रगती उज्ज्वल भविष्या कडे वाटचाल करीत होती, दर्जेदार शिक्षणासाठी होतकरू, बुद्धी जीवी, अभ्यासू शिक्षकांच्या नियुक्त्या वर भर दिले जायचे, शिक्षका कडून डोनेशन ची संकल्पना अस्तित्वात नव्होती, जिल्ह्यात आथिर्क दृष्टीने चांगल्या स्थितीत असलेल्या या संस्थे च्या चालकांचा केवळ शहरात अनेक शाखाच नव्होय त्या पुढे मोठ मोठी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज अश्या प्रकारच्या संस्था उभारण्याचा त्यांचा धाडस होता. परंतु श्री नातिक खतीब यांनी संस्थे वर ताबा मिळवल्या नंतर फक्त लोकशाही पद्धतीलाच संपुष्टात आणले नसुन शाळेची गुणवत्ता सुद्धा उध्वस्त करून टाकली. याच बरोबर आपले राजकीय वर्चस्व व सत्तेचा दुरउपयोग करून अशी रणनीती अवलंबली की बाळापूरतील इतर कोणत्याही घटका कडून दर्जेदार शिक्षण संस्था स्थापन होऊ नये अन्यथा जनतेत जागृता निर्माण होईल.
ह्यानी ताबा मिळविल्या पासून मागील तीन, चार दशकात अनेक कामचोर, अयोग्य ( कागदपत्रांच्या आधारे पात्र, प्रत्यक्षात अपात्र) , जोड धंदे करणाऱ्यांना, नप निवडणुकीत मतांचा गठ्ठा सुरक्षित करणे सोबतच देणगी म्हणून मोठ्या आर्थिक लाभासाठी कित्येक नियुक्त्या दिल्याचे दिसून येते. त्या मुळे गोर गरिबांच्या भावी पिढी चे भविष्य अंधारात गेल्या सारखे झाले आहे. अंजुमन शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे कागदोपत्री (रेकॉर्ड) प्रगती पत्रके समाधान कारक असले तरी ते निव्वळ खोटे आणि पालकांची दिशाभूल करणारे आहेत खरं म्हणजे सदर संस्थेत काही शिक्षक उत्कृष्ट अध्यापन कार्य करीत असले तरी अनेक शिक्षाकांची स्वतः ची त्या स्तरा ची अध्ययन अध्यापन संबंधी शैक्षणिक पातळी नाही ज्या स्तराचे किंवा पातळीचे अभ्यासक्रमाचा ते अध्यापन करीत आहेत. सदरहू बाब प्रत्यक्षात त्यांच्या वर्ग खोल्यात सि सि टिव्ही चे कॅमेरे बसविले व सूक्ष्म निरिक्षण केले तर तपासणीत हे प्रकरण स्पष्ट होईल.अनेक पालक अशी चर्चा करताना दिसत आहेत फक्त तपासणी व पडताळणी पारदर्शक असली पाहिजे अन्यथा कागदोपत्री विद्यार्थी प्रगती अभिलेखा नुसार कोणी ही त्यांना पगारा पोटी मिळणाऱ्या लाखो रुपये प्राप्ती पासून वंचित ठेवू शकत नाही.( अल्प संख्यांक आयोगाचे अध्यक्ष श्री प्यारे खान‌ साहेबानी अल्प संख्यांक शाळां मधील अयोग्य व अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या बदल नुकतेच जाहीर वक्तव्य केले आहे.)
इतकेच नव्होय
कोट्यवधी चा आर्थिक मलिदा (देणगी , डोनेशन ची रक्कम)सोबत मतांचा गठ्ठा अशा दुहेरी डाव अर्थात
नियुक्ती चे आमिष दाखवून
न पा निवडणुकीत मतांचा लाभ उचलण्या साठी मागील किती तरी वर्षां पासून गणित आणि विज्ञान सारखे विषय व अन्य शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात आली नाही‌ हि तर सर्व सामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांवर शिक्षक पद असताना नेमणूक न करणे, म्हणजे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उध्वस्त करण्या बरोबर जनतेशी बेईमानी आणि बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा २००९ किंवा संविधानातील कलम २१ अ चे उल्लंघन म्हणजे अपराधिक कृती मानली जाईल.
विद्यार्थ्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवण्याचा हा अधिकार संस्था चालकांना कोणी दिला आहे हा सुद्धा चर्चे चा विषय आहे.

. शाळेत शिक्षण घेत असलेले हजारो विद्यार्थ्यांमधील बोटावर मोजक्या इतके विद्यार्थी शिकवणी वर्गाच्या आधारावर मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त करीत आहेत,हा त्यांचे पालक आणि टियूटरांचा क्रेडिट आहे म्हणून शाळेच्या सर्व संबंधितांनी स्वतः ची पाठ थोपटू नये कारण शेकडो विद्यार्थ्यांचा भविष्य अंधारात गेलेला आहे.

. राज्यात न पा च्या निवडणूका जाहीर झाल्या असल्याने सदर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून श्री खतीब यांनी अंजुमन ट्रस्ट तर्फे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती साठी (बंपर ड्रा सारखी) वर्तमान पत्रात मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकीकडे अनेक वर्षे पदांना रिक्त ठेवून गोर गरीबांच्या मूलांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होत आहे आणि दुसरीकडे न पा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी नोकरी चा आमिष दाखवून सर्व सामान्य जनतेला आपल्या कडे आकर्षित करण्याची कर्तबगारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. संस्थेत रिक्त जागांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देण्यास मुख्याध्यापका कडून नकार देण्यात येत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. अचानक एवढ्या मोठया रिक्त जागांची निर्मिती कशी झाली, एवढ्या जागा आहेत किंवा कदाचित हा निधी गोळा करण्याचा व निवडणूक जिंकण्या चा डाव असावा, ह्याबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांत सुरू आहे.

वर्तमान स्थितीत बाळापूरात मुस्लिम समाजातील युवक जागरुक होत आहे वर्षोनुवर्षे पासून होत असलेले शोषण, सत्ते चा गैरफायदा घेऊन दबाव तंत्र , शेक्षणिक द्रष्ट्या त्यांना मागे ठेवण्याचा षडयंत्र , संस्थेचे अनेक आजिवन सदस्यांच्या मुले,मुली, निकटवर्तीय नातेवाईकांना नियुक्त्या देऊन नंतर त्याना धाक दाखवून गठ्ठा मते आपल्या साठी सुरक्षित करणे इत्यादी गोष्टी मुळे हा समाज कंटाळला आहे एकंदरीत अंजुमन संस्थेचा मनमानी कार्यभार व अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेल्या शैक्षणिक दर्जे वर सर्व सामान्य जनतेचा भयंकर रोष असुन, शहरात चौही कडे खतीबाने अंजुमन चा ताबा मिळविल्या पासून संस्थे ची सखोल चौकशी व्हावी ही मागणी जोर धरत आहे. चौकशी मध्ये विद्यार्थ्यांची कागदावर नोंदविण्यात आलेली प्रगती व विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शैक्षणिक स्तर तपासणे गरजेचे आहे.

. तसेच शहरातील अनेक वयोवृद्ध व्यक्तीं असे बोलताना दिसत आहे की अंजुमन संस्थेतून खतीब परिवार म्हणजे पिता , पुत्र , माता व पुत्री ह्या सर्वांची हकालपट्टी व्हायला हवी , कारण या लोकांचा अथवा यांचे पुर्व जनांचा कोणताही योगदान अंजुमन च्या रचनेत दिसत नाही.
घराणेशाही थोपवून गलिच्छ राजकारण करणाऱ्यांचा येत्या काही दिवसात म्हणजे न पा निवडणुकीत नक्कीच अंत होईल . राजकीय दृष्टीने बाळापूर शहरात सद्ध्या च्या वातावरणात हि सत्यता स्पष्ट दिसत आहे.